Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंत्यांचा झाला सन्मान – लघु पाटबंधारे विभागातील उपअभियंता इ. टी. सूर्यवंशी यांच्यासह तिघांचा झाला सन्मान

by admin
in आपला जिल्हा
A A
0

उस्मानाबाद –
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून उस्मानाबाद येथे गुरुवारी १५ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आदर्श अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी. एस. देवकर हे होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, श्याम गोडभरले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, कार्यकारी अभियंता नितीन भोसले, चंद्रकांत राऊळ, अर्जुन नाडगौडा, एस. जी. शिंगवन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकारी अभियंता भोसले यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची माहिती सांगीतली. तसेच जि. प. अभियंता संघटनेच्या वतीने दरवर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. त्यानंतर आदर्श अभियंता म्हणून लघुपाटबंधारे विभागातील प्रभारी उपअभियंता एकनाथ तुकाराम सूर्यवंशी, अभियंता जोतिबा मुंडे, करुणा चक्रे यांचा सन्मान करण्यात आला.

\"\"

या कार्यक्रमासाठी उपअभियंता संजय मांडगे, ओ. के. सय्यद, चिडगोपकर, कुलकर्णी, उपअभियंता मोहिते, आर. एन. शिंदे, जलसंधारण अधिकारी धनंजय बोरावके, प्रशांत दूधमांडे, शाखा अभियंता राजेश संगमकर, बाणाई संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू कांबळे, शाखा अभियंता आर. जी. कांबळे, जलसंधारण उपविभागीय अधिकारी भारत देसाई, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता अरुण सारंग प्रगतशील शेतकरी चक्रधर कदम, कनिष्ठ अभियंता विराज संदुपटला, सुभाष नगदे आदींसह सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते. सूत्रसंचालन चैतन्य जाधव यांनी तर आभार ओ. के. सय्यद यांनी मानले.

Tags: अभियंता दिनजिल्हा परिषद
Previous Post

निलंगा तालुक्यातील हासुरी गावची भुगर्भशास्त्राच्या तज्ञ टीम कडून पाहणी – जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाने दिल्या सूचना

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांग बालक मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांग बालक मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!