माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी उमरगा तालुक्यातील बलसुर याठिकाणी गुरुवारी (दि.१९) भेट देऊन पाहणी करणार आहेत. या दौऱ्याच्या

नियोजनासाठी जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी बुधवारी (दि.१८) उमरगा तालुक्यातील बलसुर येथे जाऊन पाहणी केली. तसेच दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेशदाजी बिराजदार, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, तहसीलदार गोविंद येरमे, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
