वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भोसगा जि प. प्राथमिक शाळेतीळ पदवीधर शिक्षक एस. के. चिनगुंडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.
माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे, डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनोरे, सोसायटीचे चेअरमन बशीरभाई तांबोळी यांच्या हस्ते अल्पसंख्याक शिक्षक सोसायटी मार्फत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पदवीधर शिक्षक चिनगुंडे यांना देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह शिक्षक मित्र, संचालक मंडळ व सर्व मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशेकराव, विस्तार अधिकारी आर. सी. मैंदर्गी, केंद्रप्रमुख आर. एस. चव्हाण, भोसगा गावच्या सरपंच शशिकलाताई गोसावी, शा.व्य.समिती अध्यक्ष काशिनाथ मानाळे, उपाध्यक्ष दत्ता बिराजदार, मुख्याध्यापक एम. एम. डोखले सह सर्व शिक्षकांनी चिनगुंडे यांचे अभिनंदन केले.