Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्याप्रमाणे लोहारा तालुक्यातही विशेष मोहीम राबवण्यात यावी

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

लोहारा / सुमित झिंगाडे
उस्मानाबाद तुळजापूर प्रमाणे लोहारा तालुक्यातही विशेष मोहीम राबवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडसह दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात वक्फ, सिलिंग, देवस्थान, कुळ यासह अन्य प्रकरणात समाविष्ट असलेल्या जमिनी शर्तभंग झाल्याने महसूल प्रशासनाने मालकी प्रकार बदलून भोगवटदार वर्ग 2 केल्या होत्या. या प्रकरणात आता शेतकरी व संबंधित व्यक्ती यांचे लेखी म्हणणे ऐकण्यासाठी महसूल प्रशासन 20 दिवसांची विशेष मोहीम राबविणार आहे.
यामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी ही विशेष मोहीम अत्यंत महत्वाची व उपयुक्त आहे. या मोहिमेत महसूल मंडळ निहाय सदर कॅम्प होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेले लेखी व तोंडी पुरावे सादर करता येणार असून योग्य व कायदेशीर पुरावे व कागदपत्रे असल्यास वर्ग 2 केलेली जमीन वर्ग 1 करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु या मोहिमेत उस्मानाबाद व तुळजापूर या दोन तालुक्यातच ही विशेष मोहीम राबवली जात असल्याने लोहारा तालुका मात्र वंचित राहत असल्याने लोहारा तालुक्याला देखील या मोहिमेत समाविष्ट करावे जेणे करून शेतकऱ्यांच्या हितार्थ वर्ग 2 मधील जमिनी वर्ग 1 मध्ये करण्याची संधी मिळेल व शेतकऱ्याच्या हितार्थ या मोहिमेतून कल्याण होईल अशी मागणी केली आहे.
उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यात 10 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत 18 महसूल मंडळात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये दप्तर तपासणी संबंधित शेतकरी व व्यक्ती यांना म्हणणे सादर करण्याची लेखी नोटीस तलाठी मार्फत दिली जाणार आहे. तर यात महसूल मंडळ निहाय हे कॅम्प होणार असून यात शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेले लेखी व तोंडी पुरावे सादर करता येणार आहे तसेच योग्य व कायदेशीर पुरावे व कागदपत्रे असल्यास वर्ग दोन केलेली जमीन वर्ग एक बदलण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

\"\"
तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी नागरिक यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याने काही प्रकरणात दिलासा मिळणार असल्याचेही नमूद केले आहे. परंतु माननीय जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील फक्त तुळजापूर व उस्मानाबाद तालुका या मंडळातच विशेष मोहीम राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने लोहारा तालुक्यात देखील सिलिंगच्या वर्ग दोन जमिनी मोठ्या प्रमाणात अनेक शेतकऱ्यांच्या नावे असल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा व न्याय देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी लोहारा तालुक्यात देखील विशेष मोहीम राबवून या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वर्ग दोन मध्ये असलेल्या जमिनी एक मध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष मोहीम मंडळ निहाय राबविण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांचे हिताचे होईल. यासाठी या निवेदनाची दखल घेऊन वंचित ठेवलेल्या लोहारा तालुक्यास देखील या मोहिमेमध्ये समाविष्ट करावे अन्यथा लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड व दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक धनराज बिराजदार, संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका अध्यक्ष बालाजी यादव, तालुका कामगार आघाडी अध्यक्ष किरण सोनकांबळे, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गणेश सुरवसे, शहर अध्यक्ष पदमाकर चव्हाण, उपाध्यक्ष स्वप्नील गुंड, शरद जावळे, तालुका सचिव लक्ष्मण पवार, खंडु शिंदे, गोविंद गोरे, कार्याध्यक्ष अभिजित सूर्यवंशी, कोषाध्यक्ष ओमकार चव्हाण, तालुका सरचिटणीस छगन फुलसुंदर, लक्ष्मण लोहार, तालुका कामगार आघाडी सचिव विजय जाधव तर दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे तालुकाध्यक्ष अमित सुरवसे, युवक तालुकाध्यक्ष योगेश सुरवसे, शहराध्यक्ष रोहित शिंदे, रोशन कांबळे सह शेतकरी यांच्या सह्या आहेत.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंतराव पाटील

Next Post

विमा रकमेच्या उर्वरित वसुलीसाठी आमदार कैलास पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, संपत्तीचा शोध सुरू..

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

विमा रकमेच्या उर्वरित वसुलीसाठी आमदार कैलास पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट, संपत्तीचा शोध सुरू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!