वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
३३ मिनिटांत तीन राज्यांमध्ये धरणीकंप झाला आहे. नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेडमधील मुदखेड याठिकाणी रात्री १२.०३ वाजता ३ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. मुदखेड तालुक्यातील नागेली, तिरकसवाडी,पाथरवाडी या तीन गावांपैकी या भूकंपाचे केंद्र आहे. भूकंप मापक वेब साईटवर भूकंप झाल्याचं दिसत असल्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे. तसेच हा भूकंप केवळ नांदेडमध्येच झाला नाही तर हिमाचल प्रदेश व मणिपूर मध्येही धक्के जाणवले आहेत. ३३ मिनिटात तीन राज्यात भूकंप झाला आहे.