Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कै. सुशिलाआक्का कोंडीबा लोकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मातोश्री वृद्धाश्रमात विविध वस्तुंचे वितरण

admin by admin
29/12/2022
in मराठवाडा
A A
0

उस्मानाबाद / सुमित झिंगाडे
कै. सुशिलाआक्का कोंडीबा लोकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त लातूर येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृध्दाश्रम येथे मंगळवारी (दि.२७) स्वर्गीय सुशिला लोकरे यांच्या तीन कन्या व जावई प्रा. धनंजय माने, पत्नी सुरेखा माने (बार्शी), प्रा. डॉ. महेश मोटे, पत्नी मिरा मोटे (मुरूम, ता. उमरगा) व प्रा. डॉ. अशोक बेवले, पत्नी ललिता बेवले (ता. भोकरदन) या परिवाराकडून भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात मातोश्री कै. सुशिलाआक्का लोकरे व कै. कोंडीबा लोकरे यांच्या प्रतिमेस सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन पुष्यहार घालून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने आश्रमास तीन लोखंडी कपाटे व आजी-आजोबांसाठी सस्नेह भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.भरतराव चव्हाण होते. यावेळी लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, संस्थेचे ट्रस्टी श्री. धनाजी तोडकर, मातोश्री आश्रमाचे व्यवस्थापक नरसिंह कासले, उद्योजक नागेश सोनटक्के, जीवन घाटोळे, बालाजी घाटोळे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, पत्रकार डी. डी. तारे, बालाजी व्हनाजे, प्रा. विजया बेलकेरी, डॉ. वंदना जावळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रातिनिधिक स्वरूपात आश्रमातील आजोबा आदरणीय श्री. भरतराव चव्हाण व मातोश्री सौ. इंदुताई काळे यांना नववस्त्र, ब्लॅंकेट व पुष्पहार घालून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात कुमारी मनश्री महेश मोटे हिने आई मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार…. व ये तो सच है कि भगवान है I या सुमधुर आवाजातील गीताने झाली. डॉ. महेश मोटे व प्रा. धनंजय माने मनोगत व्यक्त केले. मनोगतात त्यांनी आक्कांच्या अवीट गोड अशा स्मृतींना उजाळा देवून कृतज्ञताभाव व्यक्त केला. त्यांच्या स्वभावाविषयी व सेवाभावीवृत्ती विषयीचे विविध प्रसंग त्यांनी व्यक्त केले.

मातोश्री वृद्धाश्रम

                    वृद्धाश्रमाचा इतिहास व वाढत चाललेली महती श्री चव्हाण यांनी दिली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने या परिवाराने सामाजिक बांधिलकीची गरज लक्षात घेऊन आश्रमास जी मदत केली. ती समाजोपयोगी असून अशा उपक्रमशीलतेतून पुढच्या पिढीने हा आदर्श घेतला पाहिजे. असे चांगले विचार व कृतीची आज समाजाला गरज असल्याचे शेवटी ते म्हणाले. एकनाथ दुडिले, कमलाकर लोकरे, सुभाष लोकरे, रंगनाथ लोकरे, प्रकाश लोकरे, दिलीप लोकरे, भानुदास गुंडरे, मानसी मोटे आदींनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अशोक बेवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय जाधव तर आभार प्रा. दत्तात्रय साखरे यांनी मानले. यावेळी माने, मोटे व बेवले परिवाराकडून या आश्रमातील आजी-आजोबांना व सर्व पाहुण्यांना दिवसभरातील चहापान, नाष्टा व दोन वेळचे स्वादिष्ट स्नेहभोजन देण्यात आले. याप्रसंगी राहणाऱ्या सर्व आजी-आजोबा आणि लोकरे परिवारांचे नातेवाईक उपस्थित होते.

Previous Post

सालेगाव येथे ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार

Next Post

येणेगुर ग्रामपंचायतच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा बसवराज पाटील व शरण पाटील यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर
मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

02/10/2024
मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप
मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

21/03/2024
मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

03/08/2023
Next Post

येणेगुर ग्रामपंचायतच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा बसवराज पाटील व शरण पाटील यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's