वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क – अचलेर
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुभाष विश्वनाथ बलसुरे यांचा शनिवारी (दि.३१) सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव हे होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. कदम, विद्या विकास हायस्कूल अचलेरचे मुख्याध्यापक बी.डी. बेंडगे, आष्टाकसारचे केंद्रप्रमुख आर. एस चव्हाण, ई.एम शिंदे, केंद्रीय मुख्याध्यापक विष्णुपंत सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी कु. अमेरिका खंडाळकर व कु. प्राची पुजारी यांनी आपल्या गुरूजी विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच विष्णुपंत सगर, केंद्रप्रमुख राम चव्हाण, बी. डी. बेंडगे, जगदीश सुरवसे, सतिष माळी, युवराज आलुरे, शिंदे आण्णा सिंदगाव, बालाजी मसलगे, डी.डी. कदम, दयानंद सोनवणे, कनिष्ठ लेखाधिकारी उमरगा प्रियांका साखरे ,सौ. महानंदा बामणकर, सौ. ज्योती घोळसगावे व सौ. नीता बलसुरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात बलसुरे सरांनी त्यांच्या ३३ वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीत केलेल्या कार्याचा गौरव केला. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक जयंत आष्टेकर यांचा प्रभारी मुख्याध्यापक पद स्वीकारले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
भास्कर बेशकराव यांनी अध्यक्षीय भाषणात बलसुरे सरांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कामाचे कौतुक केले. बलसुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सेवा काळात सहकार्य केलेल्या सर्व सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी व पालकांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी बलसुरे सरांचा सर्व परिवार, नातेवाईक, मित्र परिवार सहकुटुंब हजर होते. आष्टा, बोरगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनराज कुडकले यांनी तर प्रास्ताविक अतुल बाबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील मारुती डोईफोडे, गणेश काळे, विजयकुमार बुकन सर, अतुल बाबळे, मुख्याध्यापक जयंत आष्टेकर, कृष्णा खंडागळे, शंकर सोमवंशी, नामदेव डुकरे, शाळेतील सेवक गुरुसिदय्या स्वामी, श्रीमती बिस्मिल्लाबी पिरजादे, श्रीमती जैबुनबी जमादार यांनी परिश्रम घेतले.