वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी (दि.१४) आनंद मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी लोहारा तालुक्याचे कार्यालयीन शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, मुख्याध्यापिका उलन कांबळे, शिक्षक सुधीर घोडके, सौदागर शेख, गोविंद जाधव, संभाजी परिट, श्रीमती राठोड सविता, श्रीमती बिडवे स्वाती उपस्थित होते.
तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा (रवा) शाळेतील मुख्याध्यापक संजय भोयटे, बसया स्वामी, गोपीनाथ मैंदाड, अजित जाधव, बाबासाहेब मनोहर, सौदागर पांचाळ व विद्यार्थी, पालक यांनी या बाल आनंद मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध पदार्थांची खरेदी केली. व या आनंद मेळाव्याचा आनंद घेतला.