वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता 14 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
डॉ. गणेश वीरभद्र शेटकर – अपक्ष या एका उमेदवाराने शिक्षक मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे काळे विक्रम वसंतराव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव – भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव – वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील – अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) – अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख – अपक्ष, कादरी शाहेद अब्दुल गफुर – अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी – अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके – अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील – अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर – अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव – अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे – अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे – अपक्ष असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने (भा.प्र.से.) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.