वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील मोघा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजी शिवाजी बाबळे व व्हाईस चेअरमन पदी सुरेश दरेबा भोकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
लोहारा तालुक्यातील मोघा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी बुधवारी (दि.२५) बैठक घेण्यात आली. या बैठकीत चेअरमन पदी बालाजी शिवाजी बाबळे व व्हाईस चेअरमन पदी सुरेश दरेबा भोकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. माळी हे होते. या बैठकीला सोसायटी संचालक रावण रामराव पवार, बसवेश्वर तुकाराम हत्ते, अंगद शिवाजी भोंडवे, तानाजी महादेव शिंदे, राम अंकुश कुंभार, रतन पंडा हिरवे, दामू कुष्णा गरगडे, सुनिता हिराचंद गोरे, सुमन शिवाजी बाबळे आदी संचालक उपस्थित होते. निवडीनंतर नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांचा सत्कार

करण्यात आला. यावेळी सरपंच सचिन गोरे, उपसरपंच विलास गरगडे, ग्रामसेवक नेताजी दबडे, गोविंद जाधव, दादा पवार, अरुण सुर्यवंशी, भाऊराव जाधव, पोलीस पाटील दिपक जाधव, बबन भोंडवे, सतिश मत्ते, आंकुश बाबळे, राजेश भोंडवे, राम गरगडे, सम्राट पाटील, आबजल मुजावर, अस्लम मुजावर, गोंविद गोरे, दत्ता गरगडे, राजु मोहिते, तुळशिराम भोंडवे, कुष्णा भोंडवे, जालिंदर तडुळे, किशोर बाबळे आदी उपस्थित होते.




