वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या तीन दिवस सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहली दरम्यान विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या.
दिनांक 08 ते 10 फेब्रुवारी 2023 या 3 दिवसादरम्यान लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक सहलीमध्ये स्कुलमधील विद्यार्थ्यांनी जालना जिल्ह्यातील माळाचा गणपती मंदिर दर्शन, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा येथील त्यांचे वडील लखोजीराव जाधव यांचा राजवाडा व जिजाऊ सृष्टी, उल्कापातामुळे तयार झालेले भारतातील एकमेव सर्वात मोठे नैसर्गिक लोणार सरोवर व परिसरातील हेमाडपंती शिवमंदिर, विदर्भातील प्रसिद्ध शेगांव येथील संत श्री गजानन महाराज मंदिर व समाधी दर्शन, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य, तसेच जागतिक स्तरावरील आश्चर्यापैकी एक आश्चर्य असलेले अजिंठा येथील प्राचीन बुद्ध लेण्या अशा विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देवून त्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व याविषयी सविस्तर माहिती घेवून सहलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण घेतले.
ही शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सोमनाथ कुसळकर, प्रेमदास राठोड, व्यंकटेश पोतदार, मुकेश रोडगे, संचालिका माधुरी चोबे, सविता जाधव, मीरा माने, माधवी होगाडे, संतोषी घंटे, स्वामीनी होंडराव आदींनी परिश्रम घेतले.