जिल्हा परिषद सेस योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रथम प्राधान्याने अनुसूचित जाती, जमाती, अपंग, महिला, व इतर शेतकऱ्यांना औजारे किमतीच्या ५० टक्के किंवा दहा हजार रुपये मर्यादीत अनुदान दिले जाणार आहे. याचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेस योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रथम प्राधान्याने अनुसूचित जाती, जमाती, अपंग, महिला, व इतर शेतकऱ्यांना औजारे किमतीच्या ५० टक्के किंवा दहा हजार रुपये मर्यादीत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी लेखी स्वरुपात विहीत नमुन्यात सर्व कागदपत्रासह विहीत मुदतीत अर्ज सादर करावे. सदरील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती लोहारा येथे सुरू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ ते ५ एच.पी. कडबाकुटी यंत्र (आय.एस.आय मार्क), ५ एच. पी. पाणबुडी पंप संच (आय. एस. आय मार्क), पी.व्हि.सी. पाईप संच (आय.एस.आय मार्क), बायोगॅस संयंत्र बांधणे, निंबोळी पावडर यंत्र, फवारणी पंप, ब्रश कटर, पिक विविधीकरण बियाणे (तुर, मुग, उडीद, तीळ), टोकन यंत्र आदींसाठी हे अर्ज करता येणार आहेत. यासाठी अर्जासोबत ७/१२ उतारा, आठ (अ), बँक पासबुक, आधार कार्ड जोडावे. तसेच ५ एच.पी. पंप घेण्यासाठी ७/१२ वर विहीरीची नोंद असणे आवश्यक आहे व कडबाकुटी साठी जनावर असल्याचे सर्टिफेकट जोडावे. तरी तात्काळ आपले मागणी अर्ज पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे जमा करावेत असे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती लोहारा यांनी केले आहे.