लोहारा नगरपंचायत कार्यालयाच्या नवीन ईमारत व गावतलाव सुशोभीकरण (नाना नानी पार्क) कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते (रविवारी (दि.४) करण्यात आले.
लोहारा शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरात नगरपंचायत कार्यालयाची नूतन इमारत बांधकाम करणे – ५ कोटी रु. व गाव तलावाचे सुशोभिकरण करणे – १० कोटी रु. असा एकूण १५ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करून घेतला. रविवार (दि. ४) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या निधीतून नगर पंचायत कार्यालयाची ३ तीन मजली सुसज्ज इमारत फर्निचरसहित उभारण्यात येणार आहे. तसेच तलाव सुशोभिकरण अंतर्गत बाल उद्यान, ध्यान केंद्र, व्यायामशाळा, व वॉकिंग ट्रॅक आदी सुविधा उपल्बध करून देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वैशाली खराडे होत्या. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे, नगरसेवक अमीन सुंबेकर, नगरसेविका शामल माळी, कमल भरारे, सारिका बंगले, शमाबी शेख, आरती गिरी, सुमन रोडगे, आरती कोरे, नागण्णा वकील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी नगरसेवक अविनाश माळी, अमोल बिराजदार, जालिंदर कोकणे, गौस मोमिन, विजयकुमार ढगे, अभियंता सुमित पाटील, श्रीकांत भरारे, सुरेश दंडगुले, दीपक रोडगे, प्रमोद बंगले, के.डि. पाटील, ओम कोरे, राजेंद्र सुर्यवंशी, राजेंद्र माळी, अमोल माळी, राजेंद्र कदम, बाळासाहेब कोरे, जिंदावली शेख, रोहन खराडे, सुरेश वाघ, अरुण जगताप, प्रवीण जगताप, सकलेन शेख, महादेव धारुळे, भगवान मक्तेदार, विनोद मुसांडे, रमेश जाधव, प्रताप लोभे, मल्लिनाथ घोंगडे, बालाजी मक्तेदार, नवनाथ लोहार, गणेश काडगावे, श्रीशैल्य मिटकरी, पप्पू मुळे, बाळु सातपुते, मल्लिनाथ बिराजदार आदीसह नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी गटनेते अभिमान खराडे यांनी केले. सुत्रसंचलन अभिजीत गोरे यांनी तर कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे यांनी आभार मानले.