तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग व सुपरवायजर रवी बनजगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम महाडीबीटी मार्फत ऑनलाईन नोंदणी केलेल्या २५ शेतकऱ्यांची निवड सोयाबीन व तूर यासाठी झाली. या प्रत्येक शेतकऱ्यास शनिवारी (दि.१७) सोयाबीन व तूर बियाण्याचे अनुदानावर परमीट ग्रामपंचायत कार्यालय आष्टाकासार येथे वाटप करण्यात आले. तसेच ऑफलाईन अर्ज केलेल्या ९७ शेतकऱ्यांपैकी १९ शेतकऱ्यांना ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यास प्रकल्पाचे सोयाबीन बियाणे परमीट ३० किलो प्रमाणे वाटप करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना ८ किलो बियाण्या प्रमाणे मिनी किट ड्रॉ पद्धतीनेच वाटप करण्यात आले. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्याने केवायसी करून आधार शेडिंग करावे. यासंदर्भात बँकेतील मॅनेजर यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्याचे आधार शेडिंग करून घ्यावे अशी माहीती कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. एमआरइजीएस अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळखत निर्मिती नाडेप युनिटचे प्रस्ताव शेतकऱ्यांनी सादर करावे असे आवाहनही कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी केले. तसेच चांगला पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये असे सांगण्यात आले.
यावेळी उपसरपंच वसंतराव सुलतानपुरे, सिद्रामप्पा तडकले, तात्या सोमवंशी, अण्णाराव पाटील, नागनाथ मदने, अरुण तडकले, जिनेन्द्र कासार, अमोल बलसुरे, सागर टिकाबंरे, योगीराज कुडुकले, संजय काबडे, वैजिनाथ शिदोरे, शरणप्पा कुडुकले, सुधाकर बचाटे बाळासाहेब सोमवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.