लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील नृसिंह प्रतिष्ठाणच्या वतीने शुक्रवारी (दि. २३) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नीट, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील नृसिंह प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार होते. या कार्यक्रमासाठी आमदार ज्ञानराज चौगुले, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नीट, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोहारा तालुक्यातील वडगाव (गांजा) येथील जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांना नृसिंह प्रतिष्ठान व हिप्परगा (रवा) ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते लोहारा तालुका भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी जे क्षेत्र निवडणार आहात. त्यात अव्वल राहण्याचा प्रयत्न करा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. पुढील काळात तुमच्या अभ्यासक्रमा बरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करा असे आवाहन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन यापुढेही अशाच पद्धतीने अभ्यास करून यशस्वी व्हा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, सरपंच अभिमान कांबळे, उपसरपंच तथा नृसिंह प्रतिष्ठानचे संस्थापक विजय लोमटे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, अमीन सुंबेकर, प्रमोद बंगले, पोलीस पाटील संजय नरगाळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव यांच्यासह मनोज गवळी, धनराज नरगाळे, प्रभाकर मोरे, सोमनाथ मुळे, नारायण माळी, अनिल आतनुरे, सारंग गाटे, नितीन मोरे, आंगद मुळे, सागर जाधव आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. याच कार्यक्रमात सोलापूर पोलीस दलात महिला पोलीस पदावर निवड झालेली मोहिनी मोरे तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनघा देशमुख व कोविड काळात विशेष कार्य केलेल्या सुवर्णा जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच विजय लोमटे यांनी केले सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी तर मधुकर जाधव यांनी आभार मानले.
————————–
या विद्यार्थ्यांचा झाला सत्कार
नीट परीक्षेत यश संपादन केलेले विरेश मैंदाड, अभिषेक जगताप, ऋतुजा काडगावे, हिंदवी जगदीश लांडगे यांच्यासह दहावी परीक्षेत समिक्षा सोमवंशी, स्नेहा सुरवसे, अंकिता पाटील, ईश्वरी पाटील, सुजाता मुळे, गायत्री मोरे, श्वेता विजय लोमटे, सृष्टी जाधव, स्वरांजली मोरे, वसिया मुल्ला तसेच बारावीतील ऋतुजा नरगाळे, शुभांगी मुळे, प्राची जाधव, धनश्री जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.