लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे रविवारी (दि.२५) जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला नळ योजनेच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तालुक्यातील सालेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंदराव साळुंके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच भाग्यश्री पाटील व माजी सरपंच निवृत्ती दाजी साळुंके यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सुनील साळुंके यांनी संबंधित इंजिनियर व गुत्तेदार यांना या योजनेचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सदरील योजनेसाठी सहकार्य करावे असे आवाहन उपस्थित नागरीकांना केले.
यावेळी सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच हुसेन शेख, इंजिनिअर बन्सी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर भालेराव, मनोज देशपांडे, संगीता बाबर, शालीनबाई साळुंके, नितीन देशपांडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, माजी उपसरपंच प्रवीण गोरे, बालाजी जाधव, हनुमंत बाबर, धनू बाबर, दादासाहेब बाबर, हनुमंत भांगे, मधुकर भांगे, मारुती साळुंके, महेश साळुंके, पांडुरंग गुरव, सुशील साळुंके, राहुल शेंडगे, संभाजी तडोळे, लक्ष्मण तडोळे, अरविंद गोरे, शिवाजीदादा साळुंके, ग्रामपंचायत शिपाई बबन बाबर, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते.