भाजपाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी संताजी चालुक्य पाटील यांची निवड झाल्याबद्दल लोहारा तालुका भाजपाच्या वतीने बुधवारी (दि.१९) लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, ओबीसी जिल्हा चिटणीस विजय महानुर, प्रविण चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाट, मल्लिनाथ फावडे, अशोक तिगाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
