सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांच्या शिक्षण, प्रशिक्षण व सर्वांगीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील शिक्षिका अंजली विश्वनाथराव चलवाड व बी. एम. बालवाड यांना प्रदान करण्यात आला.
धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात धाराशिवचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) शाम गोडभरले, जि.प. कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवदत्त गिरी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, महाराष्ट्र राज्य दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा व बालगृह संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. बी.आर.कलवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच
कार्यक्रमात शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील प्राचार्य बी.एम.बालवाड यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, संभाजी गोपे व सुनिता रामराव कज्जेवाड यांना आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, सर्व सहकारी कर्मचा-यांकडून अभिनंदन करण्यात आले.