Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध गीतांवर बहारदार नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची जिंकली मने

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/02/2024
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात ; विविध गीतांवर बहारदार नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची जिंकली मने

आपल्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत ठेवणारे आणि शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार नृत्य सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरडे होते. भाजपा उमरगा – लोहारा (Lohara) विधानसभा प्रमुख राहुल पाटील, लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेनेचे माजी गटनेते अभिमान खराडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, कौडगावचे सरपंच बालाजी भोसले, नगरसेविका शामल माळी, अश्विनी कळसकर, संचालिका माधुरी चोबे, शिवराज झिंगाडे, सतिश गिरी, अभिजीत जाधव आदीची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम स्कुलमध्ये मान्यवरांचे आगमन होताच महिला शिक्षकांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराजाचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य शहाजी जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या दशकपूर्ती निमित्त मागील १० वर्षातील शाळेचा गुणवत्तेच्या जोरावर चढता असलेला आलेखाची माहिती देवून शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धेतील यशस्वी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी राहूल पाटील, अभिमान खराडे सतीश गिरी यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण सरडे यांनी सांगितले की, या स्कुलचे संचालिका सविता जाधव, प्राचार्य शहाजी जाधव हे दांपत्य क्रांतिज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांचा वारसा पुढे चालवत लोहारा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबध्द असून त्यांची जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर भविष्यात त्यांचे ध्येयपूर्तीसाठी काम करत राहावे असे आवाहन करत शाळेच्या दशकपूर्ती सोहळा व भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास स्कुलमधिल चिमुकल्यांनी गणेश वंदनेने सुरुवात केली. त्यानंतर आमच्या पप्पांनी गणपती आणला, माझ्या नावानं बंगला बांधला, नाखवा बोटीने फिरवाल का हे कोळी नृत्य, दैवत छत्रपती, रंगिलो म्हारो धोलना, मैं निकला गड्डी लेके, तुझमे रब दिखता है, कोळी गीत, राजस्थानी नृत्य, गुजराती गरभा, पंजाबी नृत्य, अंगात आलया, गोंधळगीत, जलवा,वजय हो, पुष्पा, ऑल इज वेल, मेरावाला डान्स असे प्रसिद्ध बॉलीवुड नृत्य, पाटलांचा बैलगाडा, आले मराठे , नववारी साडी पाहिजे, मंगळागौर, गौरव महाराष्ट्राचा हे मराठी लोकनृत्य, इस्रो व चांद्रयान – ३ आजी – आजोबा यांची नाटिका, याबरोबरच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण झाल्याची महती दर्शविणारे मेरे घर राम आये है हे नृत्य आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नाटकाच्या माध्यमातून सादर केलेला राज्याभिषेक सोहळ्याने उपस्थितांचे मने जिंकली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव व सोनाली काटे यांनी तर प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलमधील सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, पुजा चौरे, माधवी होगाडे, अनिता मनशेट्टी, ईश्वरी जमादार, मीरा माने, अर्चना सोणके, सरिता पवार, चांदबी चाऊस, रेश्मा शेख, शीतल बिराजदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलवार्षिक स्नेहसंमेलन
Previous Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Next Post

लोहारा तालुक्यातील हराळी येथे कुमार साहित्य संमेलन

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
प्रा. डॉ. प्रितम मुळे यांना रसायनशास्त्र विषयातील पीएचडी
शैक्षणिक

प्रा. डॉ. प्रितम मुळे यांना रसायनशास्त्र विषयातील पीएचडी

12/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
Next Post
लोहारा तालुक्यातील हराळी येथे कुमार साहित्य संमेलन

लोहारा तालुक्यातील हराळी येथे कुमार साहित्य संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's