लोहारा (lohara) येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या इयत्ता पाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मतदान जनजागृती ( public awareness about voting) केली.
यावेळी स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. यशवंत चंदनशिवे, व्यंकटेश पोतदार, सविता जाधव, सोनाली काटे यांच्यासह स्कुलमधील विद्यार्थ्यानी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत घरोघरी जाऊन सर्व नागरिक आणि महिला यांना सांगितले की, येत्या ७ मे रोजी लोकसभा (lok sabha) निवडणुकीच्या मतदान दिवशी आपण सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार व कर्तव्य आहे, या दिवशी आपण बाहेरगावी, सहलीला फिरायला जावू नये. आपल्या देशाच्या विकासासाठी १०० टक्के मतदान करून प्रत्येकाने आपल्या मतदानातून योग्य उमेदवार निवडून देण्याचा अधिकार हा घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकास दिलेले आहे. ते अधिकार त्यांनी बजावून लोकशाही बळकट करण्याचे काम करावे. याचबरोबर नोटाचे बटन दाबून आपले अमूल्य असे मत वाया जाऊ देवू नका असे आवाहन करून मतदानाबाबत जनजागृती केली.