लोहारा (lohara) तालुक्यातील माकणी (makni) येथील भारत विद्यालयातील १९९७-९८ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल सव्वीस वर्षांनी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा एकत्र शाळेत भेट झाली. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.
तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयात १९९७-९८ सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रा.मा. पवार हे होते. यावेळी मठाधीश शामचैतन्य महाराज, हभप महेश महाराज, प्राचार्य राम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी माजी प्राचार्य विठ्ठल मुसांडे, केशव कुरुम, तुकाराम उपासे, पांडुरंग ओवांडकर, माणिक बेंडगे, दशरथ साठे, दिगंबर पवार, बब्रुवान कांबळे, राजश्री कांबळे, अशोक आनंदगावकर, शाहुराज जाधव, अशोक साठे, जग्ननाथ सुर्यवंशी,बालाजी पाटील, लिपिक अशोक साठे, सेवक बाबु कांबळे, सुरेश सगर, गणेश तुंगे हे सर्व तत्कालीन शिक्षकांसह कर्मचारी उपस्थित होते. स्नेहमेळावा आयोजित करण्यासाठी मनोज पवार व सत्यभामा कुंभार यांनी प्रथम पुढाकार घेत सर्वांपुढे हा विषय ठेवला होता. याला अजित पाटील, औदुंबर भोसले, सचिन परतापुरे, सुमन आलमले, भाग्यश्री नरसाळे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवतगीता व ट्रॉफीसह हार शाल श्रीफळ देऊन गुरुजन व उपस्थित मान्यवराचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भारती पवार हिने मधुर आवाजात गायिलेल्या गिताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विठ्ठल मुसांडे, श्यामचैतन्य महाराज, महेश महाराज, रा.मा.पवार यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये वामन भोरे, सुमन आलमले, महेश कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमासह दिवसभर झालेल्या या स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन सुमन आलमले, वामन भोरे, सोमनाथ सुर्यवंशी, भाग्यश्री नरसाळे, प्रतिभा करदोरे यांनी केले. शेवटी वामन भोरे यांनी आभार मानले.
सचिन परतापुरे यांनी हा संपूर्ण कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह केले. या स्नेह मेळाव्यासाठी अजित पाटील, मनोज पवार, औदुंबर भोसले यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेत एकमेकांना पुन्हा भेटण्याचे अश्वासन देत निरोप घेतला. तब्बल २६ वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत येऊन त्यावेळीच्या सर्व मित्र मैत्रिणींना भेटता आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.