लोहारा तालुक्यातील भोसगा येथे शालेय विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी भेडसावणारी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
तालुक्यातील भोसगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना १११ छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचाल सोपी व्हावी तसेच तांडा, वस्ती , झोपडपट्टीवरील विद्यार्थ्यांना पावसात येणे जाणे सोपे जावे, अभ्यास करण्याची वृत्ती वाढावी, पावसाळ्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व त्या मानाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी हा दृष्टिकोन ठेवून आप्पाराव पाटील यांच्या वतीने शाळेत उपस्थित सर्व १११ विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजाराम दासिमे, माणिक बिराजदार, सुभाष बिराजदार, जिलानी शहा, व्यंकट कागे, चंद्रकांत मानाळे, मुकेश सोनकांबळे, शिवशंकर हत्तरगे, वैजिनाथ कागे, दादा वडगावे, यल्लालिंग एकुंडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक एस. के. चिनगुंडे यांनी तर एम. पी. गायकवाड यांनी आभार मानले. चि. ईश्वर आप्पाराव पाटील यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आप्पाराव महादेव पाटील यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.