लोहारा तालुक्यातील माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सिनिअर क्लार्क आर. के. मुगळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आर.के. मुगळे हे सुरुवातीस १९८८ पासून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे रुजू होते. ते २०१६ पासून संस्थाअंतर्गत बदलीन्वये आजपर्यन्त माकणी येथे रुजू होते. त्यांचा एकूण सेवाकाल ३६ वर्षाचा झाला. हा सेवाकालावधी पूर्ण केल्यामुळे ते सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे हा सेवापूर्ती गौरव सोहळा साजरा करून त्यांना पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि आरोग्यदायक जावो अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. या सेवापूर्ती सोहळ्यात प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे, डॉ. एस.ई. मुंडे, डॉ. रुपचंद खराडे, डॉ. अनिल गाडेकर, डॉ. प्रविण मोरे व कार्यालयीन अधिक्षक किशोर जगताप, संतोष सोमवंशी आदी कर्मचाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त करत आतापर्यन्तच्या त्यांच्या सेवा कालावधीतील आठवणींना उजाळा दिला. सत्कार सोहळ्यास उत्तर देताना आर. के. मुगळे यांनी प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, अश्लेष मोरे व सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानत या सर्वांचा मी ऋणी आहे असे भावूक होवून म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. किरण लोमटे यांनी तर डॉ. सुर्यकांत कांबळे यांनी आभार मानले. या सेवागौरव सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. अतुल बिराजदार व इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.