लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे शनिवारी (दि.२७) रुग्णांना फळे वाटप व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.
तालुक्यातील सास्तुर (sastur) येथे अशोकराजे सरवदे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच निवासी दिव्यांग शाळा सास्तुर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, केशव सरवदे, मारुती जाधव, बंकट माळी, नितीन सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.
