लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात सोमवारी (दि.९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. महिला धोरण ते महिला सक्षमीकरण : एक प्रवास या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.
या राज्यस्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश पाटील हे होते. यावेळी उद्घाटक प्रा. संभाजी भोसले, प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या प्राचार्या यु. व्ही. पाटील, प्रा. राजेंद्र निगडे, प्रा. लक्ष्मण बिराजदार, प्रगतशील शेतकरी शहाजी जावळे, प्रा. दत्ता कोटरंगे (सांस्कृतिक विभाग प्रमुख), डॉ. मनोज सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे. या स्पर्धेत कु. यश रवींद्र पाटील (महात्मा फुले महाविद्यालय, पनवेल) याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला एकरा हजार रू. धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक खरात स्वप्नील सोपान (एम. पी. विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, त्यास पाच हजार रू. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तृतीय क्रमांक रमेश सुनील कचरे (एस. पी. कॉलेज, पुणे) तीन हजार रू. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ गीता माधव वाडकर (महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा) एक हजार पाचशे रू. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला. या वकृत्व स्पर्धेसाठी संयोजन समिती व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. संभाजी भोसले, प्रा. लक्ष्मण बिराजदार, प्रा. राजेंद्र निगडे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रा. शिवाजी कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनोज सोमवंशी यांनी तर प्रा. डी. एन. कोटरंगे यांनी आभार मानले.