Vartadoot
Wednesday, March 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली येथे घेतली भेट

मुख्य संपादक by मुख्य संपादक
30/10/2024
in निवडणूक
A A
0
सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली येथे घेतली भेट
Ad 10

उमरगा ( अ. जा. ) राखीव असलेल्या मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची महाशक्ती परिवर्तन आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल केल्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगून निवडून येण्यासाठी आपला आशीर्वाद द्यावा अशी मागणी सातलिंग स्वामी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.

परिवर्तन महाशक्ति आघाडी मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सातलिंग स्वामी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमरगा ( अ. जा. ) मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला .
सातलिंग स्वामी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे प्रतिनिधित्व करताना लोकांसमोर नव्या दृष्टिकोनाने विकास साधण्याचे आणि पारंपरिक राजकारणाच्या बाहेर जाऊन जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या अर्जाद्वारे स्थानिक प्रश्नांवर ठोस कामगिरीचे वचन दिले आहे, विशेषतः ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि स्थानिक रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर जोर दिला आहे.

या उमेदवारी अर्ज सादरीकरणामुळे स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, निवडणुकीच्या मैदानात महाशक्ती आघाडीचा प्रभाव वाढू शकतो. सातलिंग स्वामी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीतील ना. ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामुळे आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज सन्माननीय संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्ष व अन्य घटक पक्षांच्या एकसंघ सहभागामुळे या निवडणुकीत स्थानिक राजकारणासह महाराष्ट्र राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याप्रसंगी माडज येथील दिनेश पाटील, महेश कुंभार, सकल जंगम समाजाचे उमरगा लोहारा तालुका पदाधिकारी शंभूलिंग स्वामी, मुरुम येथील नागनाथ स्वामी, आलूर येथील रेवण फुलमाळी, पत्रकार सचिन शिंदे, विजयकुमार स्वामी, सिद्धाराम कोळी, वीरभद्र स्वामी आदींसह उमरगा-लोहारा मतदारसंघातील बहुसंख्य मतदार, नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमरगा लोहारा विधानसभामनोज जरांगे पाटीलसातलींग स्वामी
Previous Post

विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

मोठी खरेदी, गिफ्टही मोठे – दिवाळीनिमित्त खास ऑफर

Related Posts

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निवडणूक

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

05/02/2026
जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा
निवडणूक

कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा

03/02/2026
बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
Next Post
मोठी खरेदी, गिफ्टही मोठे – दिवाळीनिमित्त खास ऑफर

मोठी खरेदी, गिफ्टही मोठे - दिवाळीनिमित्त खास ऑफर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's