लोहारा येथील आधार सेवा फाउंडेशन आणि शालेय शिक्षण समिती यांच्या वतीने फॉलिक ऍसिड गोळ्यांमुळे उद्भवलेल्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम याबाबत आमदार प्रवीण स्वामी व तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांना शुक्रवारी (दि.१३) निवेदन देण्यात आले.
लोहारा तहसिल कार्यालयात शुक्रवारी (दि.१३) आढावा बैठकीसाठी आ. प्रवीण स्वामी उपस्थित होते. यावेळी हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हणले आहे की, फॉलिक ऍसिड गोळ्या देण्याऐवजी पोषणतत्त्वयुक्त आहार पुरविण्यात यावा. शाळांमध्ये तपासणी सुविधा सुरू करणे आणि औषधांमुळे पालकांचा व विद्यार्थी वर्गाचा विश्वास कमी होत असल्याने तातडीने योग्य पावले उचलणे याबाबत मागणी करण्यात आली. आमदार प्रवीण स्वामी व तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी लोहारा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शालेय शिक्षण समितीचे हरी लोखंडे, आणि आधार सेवा फाउंडेशन पदाधिकारी वीरभद्र फावडे यांच्यासह प्रेम लांडगे, सलीम शेख, महेबूब गवंडी, शाम नारायणकर, अनिकेत स्वामी, नितीन जाधव उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि शैक्षणिक पर्यावरण सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.