Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली दोन लाख चाळीस हजार रक्कम फिर्यादीना परत; धाराशिव सायबर पोलीसांची कामगिरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/12/2024
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
ब्रेकिंग – गावठी पिस्टल (बंदुक) व काडतुस पोलिसांनी केले जप्त – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ad 10

सायबर पोलीस ठाणे: तक्रारदार नामे- प्रतिक्षा माने, वय 26 वर्षे, रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने फोन करुन तो ICICI या बॅकेतुन बोलत असल्याचे सांगून तक्रारदार यांचे क्रेडीट कार्डवर ऑफर ॲक्टीवेट करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी येईल असे सांगून तक्रारदार यांचे कडून तीनवेळा ओटीपी घेतला. त्यावेळी तक्रारदार यांच्या क्रेडीट कार्डवर अनुक्रमे 99,999 ₹,99,999₹. व 40,000₹ असे तीन ट्रान्झक्शन झाल्याचे मेसेज आले. सदरवेळी तक्रारदार यांनी सदर इसमास पैसे कट झालेबाबत विचारणा केली असता त्याने फिर्यादीचा मोबाईल रिसिव्ह करणे बंद केले म्हणून तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तक्रार केली असता सायबर पोलीसांनी तात्काळ तक्रारदार यांची ऑनलाईन तक्रार नोंदवून तांत्रिक विश्लेषण केले असता फिर्यादींच्या क्रेडीट कार्डद्वारे ॲमेझॉनवर खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनतर तात्काळ ॲमेझॉन कंपनीला इमेल व फोनद्वारे नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन यातील फिर्यादींच्या क्रेडीट कार्डवर केलेली खरेदीची ऑर्डर रद्द करुन फिर्यादीची गेलेली संपुर्ण रक्कम 2,39,998₹ फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, सफौ कुलकर्णी, पोलीस हावलदार-कुलकर्णी, हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक- पौळ, पोलीस अमंलदार-जाधवर, भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार- खांडेकर, शेख यांच्या पथकाने केली आहे.
सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज/ लिंक/फोन/क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बॅक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देव नये. किंवा लिंकवर क्लिक/क्यु आर कोड स्कॅन करुन नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क्र.1930 वर कॉल करुन सायबर गुन्ह्याची माहिती द्यावी किंवा www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: धाराशिवपोलीससायबर क्राईम
Previous Post

येरमाळा येथे धाराशिव जिल्हास्तरीय उल्हास मेळावा

Next Post

लोकमंगल कारखान्यातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post
लोकमंगल कारखान्यातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी

लोकमंगल कारखान्यातील कामगारांची कुष्ठरोग तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's