बालेवाडी स्टेडियम पुणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये ग्रुप झेड लेवल मध्ये विद्यामाता इंग्लिश स्कूल धानुरीचा विद्यार्थी समर्थ सोमनाथ भोंडवे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
मराठी सिनेमातील स्टार अभिनेता स्वप्निल जोशी व सक्सेस अबॅकसचे सचिन पाटील या दोघांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन समर्थ चा गौरव करण्यात आला. विद्यामाता स्कूलमध्ये अबॅकस हा विषय सर्वांना नियमित अभ्यासासाठी घेतला गेला आहे. इयत्ता पहिली पासून हा विषय सर्व विद्यार्थ्यांना शिकवला जातो. शाळेची साथ व समर्थ चे प्रयत्न यातून मिळालेले हे यश कौतुकास्पद आहे. विद्यामाता स्कूलच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे (हावळे) यांच्या मार्गदर्शनाखाली अबॅकस विषयाचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतीही फीस आकारली जात नाही. संस्थेच्या वतीने समर्थ भोंडवे याचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.