दुष्काळाच्या दाहकतेत माणुसकीचा झरा साळुंके कुटुंब करतय मोफत पाणीपुरवठा
लोहारा – सुमित झिंगाडे
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील कै. सुनीता सुधाकर साळुंके यांच्या स्मरणार्थ साळुंखे कुटुंब करतोय गेले दहा वर्ष समाजसेवा .दुष्काळामुळे गावखेड्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पण टँकर कधी येईल याचा नेम नाही. आले तरी फारतर ड्रमभरच पाणी मिळते. हाताला काम नसल्याने पाणी विकत घेणे परवडत नाही. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावागावात जलदूत अवतरले आहेत. माणुसकीचा दुष्काळ टाळत त्यांनी स्वत:च्या मालकीच्या बोअर आणि विहिरीतील पाणी ग्रामस्थांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील धानुरी हे ६००० लोकसंख्येचे गाव. आहे. दुष्काळाची परिस्थितीच आता असह्य झाली आहे. यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा, असे ग्रामस्थांना वाटतेय.गावात वर्षभर ग्राम पंचायतीमार्फत पाणीपुरवठा होतो. पाइपलाइन टाकल्या असून नळांना पाणी येते. पण आता दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे फारतर ४-५ हंडेच पाणी मिळते.पण साळुंके कुटुंब च्या दानशूरांमुळे त्यांची पायपीट थांबली आहे.दिवसभर मोफत पाणी अजित साळुंके यांचे शेत गावाला लागूनच आहे. त्यांनी १० वर्षांपूर्वी शेतीसाठी बोअर घेतले. त्यास चांगले पाणी लागले. पण उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी दमछाक पाहून हृदय कालवले. मग त्यांनी वर्षभर विनामूल्य पाणी देण्याचे ठरवले तेे गरजूंना पाणी वाटतात.
ग्रामस्थ हंडे घेऊन रांगा लावतात. साळुंके कुटुंबीयांतील सदस्य काेणतीही तक्रार न करता रात्री ११ पर्यंत पाणी वाटतात. दुसऱ्यांना पाणी वाटत असताना स्वत:च्या घरातील पाणी ते गर्दी ओसरल्यानंतर भरतात. घरातही २००० लिटरची टाकी आहे. एखाद्याला बोअरचे पाणी नाही मिळाले तर ते या टाकीतूनही घेऊन जातात. साळुंके म्हणतात, आम्ही सर्व कामे सोडून पाणी वाटण्याचे काम करताे.असे सळूखे कुटूंबीय सांगत आहेत.