परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मोड तोड करून नासधूस करणाऱ्या समाजकंठकाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडी लोहारा तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
लोहारा तहसील कार्यालयात गुरुवारी (दि.१२) रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडी लोहारा तालुक्याच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हणले आहे की, परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे मोड-तोड करून नास धुस करणाऱ्या समाजकंठकाला कठोर शिक्षा करून व याच्या पाठीमागे ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांना सुद्धा त्यांची चौकशी करून अटक करण्यात यावे व कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणच्या पोलीसांनी दलित युवकांना व महिलांना काँबींग ऑपरेशन करून लाठी चार्ज करणाऱ्या पोलीसांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडी लोहारा तालुका यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर लोहारा शहरप्रमुख संघर्ष सोनवणे यांची स्वाक्षरी आहे. तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी हे निवेदन स्वीकारले. रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम भालेराव, जिल्हा सचिव तिम्मा माने, केशव सरवदे, शरद मस्के, महादेव वाघमारे, संघर्ष सोनवणे, ज्ञानेश्वर भालेराव, काकासाहेब भंडारे, गजेंद्र डावरे, तुकाराम कदम, कलाप्पा दुपारगुडे, सर्जेराव बनसोडे, शंकर गवळी, युवराज सूर्यवंशी, सर्जेराव बनसोडे, राज भंडारे, ओम भंडारे, आण्णाराव कांबळे आदीच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.