डॉ. पंजाबराव देशमुख (dr. Panjabrav deshmukh) यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र (maharashtra) शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम कृषी संजीवनी पंधरवाडा हा १७ जून ते १ जुलै पर्यंत राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोहारा (lohara) तालुक्यातील माकणी (makni) येथे कृषी संजीवनी पंधरवाडा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत बीज प्रक्रिया जनजागृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी माकणी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बीज प्रक्रियेची प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आले. बीजप्रक्रिया मुळे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगून बियाणासाठी बीज प्रक्रिया कशी महत्त्वाची आहे याबद्दल सखोल मार्गदर्शन कृषी सहाय्यक एम. एस. बिराजदार यांनी केले. तसेच सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, तूर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान बदल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षी तुर मग,उडीद या कडधान्य वर्गीय पिकाचे क्षेत्र वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तुर हे कसे फायद्याचे व आर्थिक दृष्ट्या परडणारे पिक आहे. याबद्दल सखोल मार्गदर्शन केल्यामुळे खूप शेतकऱ्यांचा कडधान्यवर्गीय पिकाकडे कल वाढलेला दिसून आला.
यावेळी उपसरपंच फुलचंद आळंगे, चेअरमन अच्युत चिकूंद्रे, प्रगतशील शेतकरी दिगंबर राठोडे, नाना साठे, गोपाळ राजपूत, पंडित पोटरे, बालाजी साठे इत्यादी उपस्थित होते. सध्या शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विविध पिकाच्या बियाणाला बीज प्रक्रिया करण्याबद्दलची प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली.