Vartadoot
Wednesday, February 11, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/02/2026
in लोहारा तालुका
A A
0
विद्यामाता स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन; विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार काकडे हे होते. तर संस्थेचे सचिव किशोर साळुंके व शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे (हावळे) यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे मॅडम यांचा मेस्टाचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. या स्नेह संमेलनाची सुरुवात मोरया मोरया या गीताने झाली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण यांचे प्रदर्शन म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केली.
पंजाबी सॉन्ग, साउथ इंडियन, लावणी, राधाकृष्ण प्रसंग, झाशी की राणी व सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष सर्वांसमोर गाणे व नाटिका यांच्या माध्यमातून सादर केले. फनी सॉंगने सर्वांचे लक्ष वेधले होते. धनगर गीत, येळकोट येळकोट जय मल्हार, मेड इन इंडिया, गोरे रंग पे ना इतना या गाण्यावरती विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. या वार्षिक

स्नेहसंमेलनासाठी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नर्सरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. मुलांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. सर्वांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचे हास्य दिसून आले. मुलांनी त्यांच्यामध्ये असणारी कला सादर केली व सर्व प्रेक्षकांचे मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम सूर्यवंशी यांनी तर संजय कांबळे यांनी आभार मानले. संस्थेच्या वतीने सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे आभार व्यक्त केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पाडले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: वार्षिक स्नेहसंमेलनविद्यामाता इंग्लिश स्कूल
Previous Post

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी
लोहारा तालुका

प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी

02/02/2026
लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's