डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) आपणास मानवतावादी व लोककल्याणकारी धम्म दिला आहे. त्यामुळे आपली केवळ नावाने बौध्द अशी ओळख न राहता ती आचरणातून ओळख निर्माण व्हावी. त्यासाठी धम्म प्रत्यक्ष आचरणात आणावा. धम्म हाच लोककल्याणाचा एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ऍड. एस. के. भंडारे यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा लोहारा (lohara) तालुका शाखा व समता सैनिक दल यांच्या वतीने लोहारा येथील लोक वाचनालय येथे शनिवारी (दि.१८) महामानव विचार जयंती व संविधान संरक्षण अभियान अंतर्गत कार्यकर्ता, पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे लोहारा तालुकाध्यक्ष तानाजी माटे हे होते. यावेळी जिल्हाध्यक्षा विजयमाला धावारे, सरचिटणीस विद्यानंद वाघमारे, कोषाध्यक्षा राजश्री कदम, पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास पांडागळे, संरक्षण उपाध्यक्ष अनिल सरतापे, संस्कार सचिव कुमार ढेपे, रत्नदिप मस्के, महीला सचिव कांचन सितापूरे, जिल्हा संघटक प्रा. सुधाकर गायकवाड, तुळजापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताभाऊ गायकवाड, छत्रपती संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना ऍड. एस. के. भंडारे म्हणाले की, आधुनिक भारताची समाज रचना जातीवर नाही तर मानवी नीती मुल्यांवर आधारित व्हायला हवी. महामानवांचे वैचारिक घनिष्ठ नाते आहे. त्यामुळे त्यांच्या केवळ प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी न करता महामानव विचार जयंती साजरी करावी. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. संविधान बदलण्याची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे भविष्यात तरुण तरुणींनी संविधानाच्या संरक्षणासाठी लढा उभारण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहनही त्यांनी केले. तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची पुजा करून त्रिसरण पंचशील पठण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे, समता सैनिक दलाचे प्रशांत भंडारे, युवराज सुर्यवंशी, स्मिताताई सोनवणे,बाळू शिंदे ,स्वप्निल सोनवणे,अजय सितापूरे, काका भंडारे, धनराज कांबळे, कोंडीबा रोडगे, अमोल गायकवाड, मंगलताई कांबळे, देविदास मस्के, निंबराज दुपारगुडे, भारतीबाई माटे, आण्णाराव कांबळे, ज्योतिबा सोनवणे, पप्पू गायकवाड, सिध्दांत मुके, नंदाबाबाई माटे, रुक्मिणी सोनवणे, भारतीताई माटे, अल्का कांबळे शिवाजी कांबळे यांच्यासह लोहारा तालुक्यातील समता सैनिक, माळेगाव, नागूर, नागराळ, खेड, जेवळी, आष्टा कासार, मार्डी, लोहारा खुर्द, माळेगाव, कास्ती, भातागळी, कानेगाव, हिप्परगा, करवंजी, होळी यासह नागरिक उपस्थित होते.