लोहारा (Lohara) तालुक्यातील माकणी (makni) येथील भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी आयेशा सय्यद हिने आविष्कार स्पर्धेत यश मिळवले आहे.
धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये भूगोल विषयाच्या वतीने मानवता विभाग “स्वच्छ आणि स्मार्ट पृथ्वी” यामध्ये नोंदणी करून रितेश महादेव कांबळे, ओंकार बालाजी सुर्यवंशी या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विज्ञान विभागातर्फे रसायनशास्त्र विभागाच्या नवीन दृष्टीकोनातून हेलियम, कार्बन डाय-ऑक्साइड, एच टू ओ चे थ्री डी, नोंदणी करून स्पिन ॲटॉमिक मॉडेल तयार केले होते. त्यामध्ये आयेशा अब्दुलअजीज सय्यद, स्नेहा सुरेश चव्हाण तसेच भौतिकशास्र विषयाने अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागामध्ये नोंदणी करून चुंबकाशिवाय दुतर्फा स्पीकर तयार केले होते. यामध्ये समर्थ सुरेश भुजंगे, पांडुरंग मनोहर कोळी या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या अविष्कार स्पर्धेमध्ये प्युअर सायन्समध्ये जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक आयेशा अब्दुलअजीज सय्यद या विद्यार्थिनीने पटकाविले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे यांनी कौतूक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील संयोजक डॉ. बी. एच. जावळे व मार्गदर्शक म्हणून डॉ. अतुल बिराजदार, डॉ. योगेश माने, डॉ. जयपाल सुर्यवंशी, डॉ. गायकवाड मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्वांचे कौतुक व अभिनंदन प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांच्या वतीने करण्यात आले.