लोहारा पोलीस ठाण्यात बुधवारी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. बकरी ईद हा सण शांततेत साजरा करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी यावेळी केले.
लोहारा पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.४) शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक आरिफ खानापुरे, प्रशांत काळे, माजी नगरसेवक आयुब शेख, सलीम शेख, महेबूब गवंडी, बाबा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच काही सूचना केल्या. या बैठकीसाठी नागरिक, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.