लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचा माजी विद्यार्थी बालाजी भैरप्पा यांची चेन्नई (Chennai ) येथील स्पेशॅलिटी केमिकल्स या अमेरिकन कंपनीच्या वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील जेवळी येथील बालाजी श्रीशैल भैरप्पा यांची प्राथमिक व विद्यालयीन शिक्षण जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालय झाले आहे. तर रासायनिक तंत्रज्ञान विद्यापीठ विभाग (युडीसीटी), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथून बी- टेक व रासायनिक तंत्रज्ञान संस्था मुंबई (Mumbai) (आयसीटी) येथून एमटेक झाले आहे. सध्या चेन्नई येथील स्पेशॅलिटी केमिकल्स (पी.पी.जी.) या अमेरिकन कंपनीच्या वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञपदी निवड झाली आहे. कंपनीकडून त्यांना प्रतिवर्षी १६.५ लाख पॅकेज दिले जात आहे. गुरुवारी (दि.१) जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाच्या या माजी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालाजी भैरप्पा यांनी मी कसा घडलो हे सांगून विद्यार्थ्यांना अभ्यासाविषयी काही टिप्स दिल्या. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक भुसणे, प्राचार्या सुरेखा चेंडके, पर्यवेक्षक एम.वाय. भोसले, मुख्याध्यापिका पी.एम. काळे (उमरगा), टी. एन. फडताळे, के.बी. आष्टी, डी.आर. भुजबळ, आर. व्ही. पाटील, एस. एस. कारभारी, पी.जी. कारभारी उपस्थित होते.