अयोध्येतील नवनिर्मित भव्य मंदिरात दि. २२ जानेवारीला श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडत आहे. प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा दिवाळी सारखा साजरा करावा व देशभरातील गावातील, शहरातील मंदिरे स्वच्छ करावे असे आवाहन केले आहे. या अनुषंगाने भाजपा लोहारा तालुका यांच्यावतीने दि. १८ जानेवारी ला शहरातील श्रीराम मंदिर व परिसर स्वच्छ करुन श्रमदान केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, जिल्हा कार्यकारिणी माजी सदस्य कमलाकर सिरसाठ, सचिन कोळी, परमेश्वर कदम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.