लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (दि.२६) संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील शिक्षक बाळासाहेब कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पांचाळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांनी भारतीय संविधानाने दिलेली न्याय, समता व बंधुता ही त्रिसूत्री व संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी सखोल माहिती दिली. वंदना अकोस्कर यांनी आभार मानले.