मराठा (maratha) बांधवांना तात्काळ जात प्रमाणपत्र caste certificate) वाटप करण्यात यावेत अशी मागणी लोहारा तालुका संभाजी ब्रिगेड (sambhaji briged) च्या वतीने जिल्हाधिकारी (collector) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोहारा तहसीलदार मार्फत बुधवारी (दि.२०) हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या मराठा समाजास दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी विशेष अधिवेशन घेऊन राज्य शासनाने सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय मराठा समाजाकरिता एसईबीसी (sebc) मराठा आरक्षण (maratha reservation) दिले आहे. परंतु सध्या चालू असलेल्या पोलीस भरती करीता तसेच इतर सरकारी नोकर भरती करीता मराठा समाजातील तरुणांना जात प्रमाणपत्रा अभावी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याची योग्य ती दखल घेऊन मराठा समाजातील मागणी करणाऱ्या युवकांना तात्काळ जात प्रमाणपत्र देण्यात यावे व मुलांना होणारा त्रास व गैरसोय थांबवावी. तसेच त्यांचे वेळे अभावी होणारे नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हा लोहारा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष खंडू शिंदे उपस्थित होते.