लोहारा (Lohara) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलाप मित्र मंडळाच्या वतीने मोहरम (moharram) सणानिमित्त बुधवारी (दि.१७) शरबत वाटप करण्यात आले.
लोहारा शहरातील मिलाप मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक भावना जपत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. मोहरम सणानिमित्त याही वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादा मुल्ला, पेशमाम आदमशहा, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नगरसेवक जालिंदर कोकणे, ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहर प्रमुख सलिम शेख, काँग्रेस अल्पसंख्यक जिल्हा सरचिटणीस रौफ बागवान, काँग्रेस तालुका सरचिटणीस इस्माईल मुल्ला, शब्बीर गंजीवाले, उमेश देवकर, महमहद फकिर, खाशिम मुल्ला, जब्बार मुल्ला, आदम मुल्ला, जिंदावली शेख, नजीर हेड्डे, नयुम सवार, वजीर मनियार, वजीर आत्तार, बलभीम पाटील, जलाल मुल्ला, बबलु फकिर, अमित विरुदे आदी उपस्थित होते.