लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी वैभव होंडराव, उपाध्यक्षपदी गौरीशंकर जट्टे, समर्थ कुंभार, सचिवपदी वीरभद्र फावडे, सहसचिवपदी महेश कुंभार आणि बाळू माशाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जयंती उत्सव कार्यकारिणीची निवड करण्यासाठी लोहारा येथील महात्मा बसवेश्वर महाराज मंदिरात माजी सरपंच नागण्णा वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी सरपंच शंकर जट्टे, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक जालिंदर कोकणे, हरी लोखंडे, के.डी. पाटील, ओम पाटील, वैजिनाथ जट्टे, बापू जट्टे, सोमनाथ जट्टे मल्लिनाथ बनशेट्टी आदींच्या उपस्थितीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मिरवणूक प्रमुखपदी शशांक जट्टे, संदीप पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश कोप्पा, सुरज चपळे, कोषाध्यक्षपदी मिलिंद बंगले, महेश पाटील आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली. दि. ३० एप्रिल रोजी सकाळी महात्मा बसवेश्वर महाराज मंदिरात ध्वजपूजन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन तसेच दि. २ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवनगर मिरवणूक काढण्यात येणार आहे. या बैठकीला संतोष फावडे, स्वप्नील स्वामी, गणेश पालके, राजू कोराळे, मंगेश बनशेट्टी, गणेश कमलापुरे, विकास स्वामी, सचिन स्वामी, केदार जट्टे, अमोल तोडकरी, गणेश तोडकरी, सचिन तोडकरी यांच्यासह नागरिक, समाजबांधव उपस्थित होते.