लोहारा तालुक्याचे नूतन तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांचा राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार यांनी तहसिल कार्यालयात जाऊन सत्कार केला. यावेळी बाजीराव पाटील, महंमद अत्तार, बळीराम धारोळे, दीपक आलमले, बालाजी सुरवसे, उमर मुल्ला, प्रहार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीमंत गरड, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बालाजी यादव आदी उपस्थित होते.