लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळा व श्री. शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत बुधवारी (दि. ३ ) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व फातिमा शेख यांची वेशभूषा केलेले दिव्यांग विद्यार्थी कु.भाग्यश्री कांबळे, कु. आदिती गायकवाड, कु. अस्मिता वाघमारे, कु. राजकन्या देडे, कु. मुस्कान बागवान, करण माने, हुसेन शेख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे हे होते. तर प्राचार्य बी.एम.बालवाड, डाॅ. मंगेश कुलकर्णी, प्रा.बाबुराव ढेले, अंजली चलवाड, संध्या गुंजारे, राम बेंबडे, राजकुमार गुंडूरे, विठ्ठल शेळगे, लक्ष्मी घोडके यांची उपस्थिती होती. दिव्यांगांच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या दिव्यांग मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कु. ममता गोटमुकले व सोनाली बेळे यांनी प्रेरणादायी शैक्षणिक गीत गायन केले.
याप्रसंगी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना डाॅ. मंगेश कुलकर्णी यांनी वैयक्तिक स्वच्छतेबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच हात धुवण्याच्या पध्दतीविषयी कृतीयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना बी.टी.नादरगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याबरोबरच महिलांसाठीच्या कायदेविषयक मार्गदर्शन केले.
बालिका दिनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वेशभूषा स्पर्धा, गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माने, संजय शिंदे, गोरक पालमपल्ले, शंकरबावा गिरी, सूर्यकांत कोरे, निवृत्ती सुर्यवंशी, किरण मैंदर्गी, सुरेखा परीट, दगडू सगर, नारायण हसनाळे, सविता बुगे, भिमराव गिर्दवाड, संभाजी गोपे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण वाघमोडे यांनी तर कु.सोनाली बेळे यांनी आभार मानले.