Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/07/2024
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कार
Ad 10

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी (दि.९) गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या यु. व्ही .पाटील मॅडम या होत्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण व डॉ. गुणवंत वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक महाराष्ट्र गीताने झाली. यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील बहिरे यांनी केले. महाविद्यालयाचा इतिहास व विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी त्यांनी थोडक्यात माहिती दिली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शाळेचा १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आहे.
प्रथम आलेली अश्विनी हणमंत रसाळ (९३ टक्के), द्वितीय आलेली अस्मिता अमोल शिवकर (९२.४० टक्के) व तृतीय आलेली सपना नेताजी भोकरे (९२ टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेतून प्रथम आलेल्या अश्विनी हनुमंत रसाळ या विद्यार्थिनीला प्राचार्या यु. व्ही. पाटील यांच्या वतीने रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. यानंतर १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेतून प्रथम आलेली श्रुती बालाजी पाटील (८५.६७ टक्के), द्वितीय आलेली निहा मुकरम मणियार (८३.६७), तृतीय आलेला प्रतीक राजेंद्र माळवतकर (८३.३३), वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली अंकिता भुजंग जावळे (८८ टक्के), द्वितीय निखिल नानासाहेब गोरे (८४.८३ टक्के) व तृतीय क्रांती काकासाहेब सूर्यवंशी (७८.१७), कला शाखेतून प्रथम कीर्ती तुषार चव्हाण (८०.३३ टक्के) द्वितीय फरहाना फिरोज पठाण (७८.६७ टक्के) व तृतीय अंकिता गुणाजी बनसोडे (७७.३३ टक्के) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रतीक राजेंद्र माळवदकर या विद्यार्थ्याने फिजिक्स या विषयात ९४ टक्के गुण घेतल्यामुळे प्रा. राजेंद्र साळुंके यांच्या वतीने ५०० रुपयांचे पारितोषिक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. कै. गणपतराव काळे यांच्या स्मरणार्थ प्रा. प्रशांत काळे यांच्या वतीने कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास प्रत्येकी एक हजार रुपये व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांस पाचशे रुपये रोख पारितोषक प्रदान करण्यात आले. कै. मुरलीधर महाराज यांच्या स्मरणार्थ प्रा. विद्यासागर गिरी यांच्या वतीने मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना सन २०२३-२४ मध्ये इयत्ता आठवीतील वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाल. त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. एमटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी भक्ती गोविंद कोकाटे हिचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वाणिज्य शाखेतील अकाउंट या विषयात पाच विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण घेतल्यामुळे प्रा. विजय उंबरे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले. डॉ. गुणवंत वाघमोडे यांनी बिकट परिस्थिती असली तरी विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे हे उदाहरण देऊन सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन शिंदे यांनी तर श्रीकांत मोरे यांनी आभार मानले. यावेळी भास्कर जाधव, प्रा. एल. पी. कुलकर्णी, प्रा. विद्यासागर गिरी, बालाजी ईरुदे, डी. आर. जाधव, नागनाथ पांढरे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. आर. सी. अष्टेकर, प्रा.आर. डी. साळुंके, प्रा. उध्दव सोमवंशी, प्रा. नारायण आनंदगावकर, प्रा. डी. आर. साठे, प्रा. बालाजी सूर्यवंशी यांच्यासह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

सास्तुर परिसरात १५० झाडांचे वृक्षारोपण

Next Post

ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी – प्रा. एन. जी. गायकवाड

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी – प्रा. एन. जी. गायकवाड

ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी - प्रा. एन. जी. गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's