लोहारा तालुक्यातील सास्तूर (sastur) येथील निवासी दिव्यांग शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हर घर तिरंगा या अभियानांतर्गत दि.१३ व १४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे यांच्या हस्ते प्रशालेतील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. दि.१५ ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते अशोकराजे सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सास्तूरच्या सरपंच शितल राहुल पाटील ह्या होत्या. यावेळी उपसरपंच मिथुन कुर्ले, ग्रा.पं.सदस्य गंगाधर पवार, गोविंद यादव, सलमान सवार, हर्षद कोकणे, रमेश भुरे यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आंबेकर, प्रकाश औसेकर, मन्मथअप्पा कूर्ले, महेशंकर मुनाळे, युसूफ पठाण, व्यंकट माने, मारुती जाधव, शंकर जाधव, उग्रसेन गायकवाड, संभाजी माळी, बालाजी माळी, राजू तेली, पोतदार मामा, उत्तम क्षीरसागर, पालक युवराज जगताप, शारदाताई जगताप, माजी विद्यार्थी उद्योजक शौकतअली मासुलदर, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी. नादरगे, प्राचार्य भरत बालवाड, प्रशालेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सास्तूर गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने व उत्साहपूर्ण वातावरणात उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ परीक्षेत प्रशालेतून प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्याचे माजी स्वातंत्र्य सैनिक कै. डॉ.खंडेराव गोपाळराव आंबेकर व कै.सुमन (अम्मा) खंडेराव आंबेकर यांच्या स्मृतिपित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते तथा शतकवीर रक्तदाते भाऊसाहेब आंबेकर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कै.वत्सलाबाई दिगंबर मरेवाड यांच्या स्मृतिपित्यर्थ डॉ.राजीव दिगंबर मरेवाड यांच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतून प्रथम आलेल्या चौधरी रौफ आल्ताफ तसेच द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी राणी मोहन मनाळे तसेच प्रशालेतून तृतीय महेश पवार यांना देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून ड्रिलमार्च व स्वागत गीताने मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोबाईलचे तसेच सोशल मिडीयाच्या अतिवापराचे दुष्परिणाम या विषयावर ममता गोटमुखले, सौंदर्या कुकुर्डे, पूजा कुकुर्डे, ऋतुजा साळूंखे, किरण खराते, अदिती गायकवाड, गिताश्री निळे या प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थीनींनी पथनाट्य सादरीकरण केले. सदर पथनाट्याचे दिग्दर्शन प्रशालेतील सोनाली बेळे या दिव्यांग विद्यार्थीनीने केले. सदर पथनाट्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. सामाजिक कार्यकर्ते अशोकराजे सरवदे यांनी रोख स्वरूपात पारितोषिक देऊन या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. यावेळी अशोकराजे सरवदे यांनी प्रशालेच्या दिव्यांग पूनर्वसन विषयक कार्याचे कौतुक केले. प्रशालेच्या या मानवतावादी कार्यास शुभेच्छा देवून समाजातील दिव्यांग या वंचित घटकासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी सास्तूरच्या सरपंच शितल पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणे हे अत्यंत कठीण काम असून, निवासी दिव्यांग शाळा समर्पित भावनेतून हे कार्य करते आहे. सास्तूर ग्रामपंचायत नेहमीच दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे. भविष्यातही सास्तूर ग्रामपंचायत निवासी दिव्यांग शाळेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तत्पर राहील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांनी तर सूत्रसंचलन प्रशालेतील विद्यार्थिनी ममता गोठमुखले व सोनाली बेळे यांनी केले. प्रवीण वाघमोडे यांनी आभार मानले.