लोहारा येथील पंचायत समिती कार्यालयात सोमवारी (दि.१५) खरीप हंगाम पूर्व तयारी तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी कृशिनिविष्ठा विक्रेत्यांना शेतकऱ्यांना वाजवी दरात उच्च प्रतीचे बियाणे खते कसे उपलब्ध होतील व शेतकऱ्यांची फसवणूक किंवा लुबाडणूक होणार नाही याबद्दल मार्गदर्शन करून बियाणे, खते, कीटकनाशक याबद्दल शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सर्व कायदेशीर बाबींचे पालन होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री. देवकते, कृषि अधिकारी शिवाजी तराळकर, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी मार्गदर्शन करून येणारा खरीप हंगाम हा समाधानकारक जाईल अशी इच्छा व्यक्त करून सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे आभार मानले. यावेळी लोहारा तालुक्यातील कृषि निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.