लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधुन सोमवारी (दि.१५) पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्कुलमधील विद्यार्थ्यानी प्रा. यशवंत चंदनशिवे, सिध्देश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड यांच्यासोबत शाळेत पतंग बनवून तो उडविण्याच्या आनंद लुटला.
स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव यांनी यावेळी मकरसंक्रांतीचे महत्व सांगताना म्हणाले की, मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असल्याने या ऋतूमध्ये आपल्या शरीरास उष्णतेची गरज भासते. या सणानिमित्त आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे एकमेकांना तीळ – गुळ वाटून देवून शुभेच्छा देतो. तीळ, गुळ, बाजरीच्या भाकरी या सर्व अन्न पदार्थाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरास ऊष्णता मिळते आणि ऊर्जा प्राप्त होते आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या शरीरात पोषक असे ताकत निर्माण होते.
त्याचबरोबर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. हा एक भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा बदल होतो अशी माहिती सांगितली. त्यानंतर सर्व चिमुकल्यांना तीळ गुळ खाऊ घालून शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत अतिशय आनंदात हा सण साजरा केला.