लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे शुक्रवारी (दि.७) कायदे विषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
लोहारा तालुका विधी सेवा समिती आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कायदे विषयक जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्त्री पुरुष समान पाहिजे या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ॲड. रविकांत भोंडवे यांनी कायदेविषयक माहिती, मुलीचे शिक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली. हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने सतीश कदम यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून, शिक्षणाचे महत्व, आरोग्य, व्यवसाय, ताणतणाव, महिलांना समान हक्क, समान कामाचा मोबदला, खेळाचे महत्त्व आदी विषयावर सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विधी सेवा समितीचे पाशा शेख, सरपंच सुरेश देशमुख, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर जाधव, स्वाती पाटील, ग्रामसेवक श्री. मोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनराज पाटील, शरद पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर देशमुख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, युवक, युवती उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी तर नितीन मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरक बालाजी चव्हाण, नितीन मोरे, लहू पापडे, प्रेरीका रंजना कांबळे, नफिसा शेख यांनी परिश्रम घेतले.