लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी गुरुवारी (दि.२८) शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यामार्फत आई-बाबा यांना मतदान करण्यासाठी भावनिक पत्र लिहिण्यात आले. तुमच्या-आमच्या उज्वल भविष्यासाठी आई-बाबा मतदान करा अशी भावनिक साद पत्राद्वारे विद्यार्थ्यांना घालण्यात आली.
तसेच स्वीप अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या अगोदर २६ जानेवारी रोजी मतदान जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली होती. तसेच ३१ जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच २८ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शाळा व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम प्राचार्य उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सचिन शिंदे व श्रीकांत मोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.